रेल्वेने भंगार विकून कमविले ८१० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:39 AM2020-03-06T05:39:45+5:302020-03-06T05:39:50+5:30

रेल्वे परिसरातील भंगार विकून ५०० कोटी तर, मध्य रेल्वेने ३१० कोटी ४९ लाख रुपयांची कमाई केली. भंगार विकून दोन्ही रेल्वेच्या तिजोरीत मिळून सुमारे ८१० कोटी जमा झाले आहेत.

The railway sold the debris and earned Rs | रेल्वेने भंगार विकून कमविले ८१० कोटी

रेल्वेने भंगार विकून कमविले ८१० कोटी

Next

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने दहा महिन्यांत रेल्वे परिसरातील भंगार विकून ५०० कोटी तर, मध्य रेल्वेने ३१० कोटी ४९ लाख रुपयांची कमाई केली. भंगार विकून दोन्ही रेल्वेच्या तिजोरीत मिळून सुमारे ८१० कोटी जमा झाले आहेत.
‘शून्य भंगार’ मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यान जुने डबे, चाके आदी ५०७ कोटींची भंगार विकले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत मध्य रेल्वेने भंगारातून ३१० कोटी ४९ लाख कमाई केली.

Web Title: The railway sold the debris and earned Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.