Join us

मध्य रेल्वेच्या 'रेल्वे परिवार देख-रेख मोहीम'त रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 6:51 PM

दोन लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये  ‘आरोग्य सेतु’ अँप

मुंबई : मध्य रेल्वे प्रशाशनाकडून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचार्‍यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली जात आहे.  कोरोनापासून सर्व जण दूर राहण्यासाठी मध्य रेल्वेने ‘रेल परिवार देख-रेख मोहीम’ सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या दोन लाखपेक्षा जास्त रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय मिळून ‘आरोग्य सेतू’’ अँप डाऊनलोड केला आहे.

रेल्वेने प्रशाशनाने कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी ‘रेल परिवार देख-रेख मोहीम’  सुरुकेलीआहे. यासह सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबाना आरोग्य सेतू हे विशेष मोबाईल अप्लिकेशन इंस्टॉल करण्याचे आवाहन करण्यात केले. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,  मध्य रेल्वेच्या पाच विभागातील तब्बल १ लाख ९७ हजार ६०४ रेल्वे कर्मचार् यांनी, त्यांच्या कुटूंबानी आणि रेल्वे कंत्राटी कर्मचारी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अँप डाऊनलोड केले आहे.  

संपूर्ण देशभर कोरोना विषाणूची साथ पसरली आहे. मात्र याविरूद्ध लढा सुरु आहे. रेल्वे कर्मचाऱ्यां देखील या लढाईत सहभाग आहे. ‘रेल परिवार देख-रेख मोहीम’ला रेल्वे कर्मचार्‍यांकडून सहकार्य दिले जात आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी इतर सर्व  विभागांशी समन्वय साधलेल्या मानव संसाधन विभागाची भूमिका उल्लेखनीय आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल म्हणाले.

सर्व रेल्वे कर्मचारी आणि अधिका-यांना एक संपर्क दैनंदिनी पाठविण्यात आली आहे. ज्यामध्ये ते ज्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधला. त्यांची नावे व तपशील लिहून ठेवाव. जेणेकरून जर यापैकी कोणी कोरोनाग्रस्त आढळला, तर या संपर्क दैनंदिनीचा मागोवा घेण्यासाठी मदत होऊ शकेल. यासह मध्य रेल्वेच्या सर्व विभागांतील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या संसाधनामुळे मोहिमेत २ लाखांची संख्या गाठणे शक्य झाले आहे, असे मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी  डॉ. ए.के. सिन्हा म्हणाले.

------------------------------------------------------

 मुख्यालय  - एकूण रेल्वे कर्मचारी १७,२९५ -   अँप डाउनलोड केलेले १६,४८५ + १६,५७२ कुटुंबातील सदस्य

 मुंबई विभाग - एकूण रेल्वे कर्मचारी ३१,९०७ - अँप डाउनलोड केलेले ३०,०१९+ ४४,०६१ कुटुंबातील सदस्य

 नागपूर विभाग - एकूण रेल्वे कर्मचारी १५,७५० - अँप डाउनलोड केलेले १४,०५२ + १४,१५४ कुटुंबातील सदस्य

भुसावळ विभाग - एकूण रेल्वे कर्मचारी १६,०२६ -  अँप डाउनलोड केलेले १३,८४६ + १०,४०१ कुटुंबातील सदस्य

 पुणे विभाग - एकूण रेल्वे कर्मचारी ९,२१० - अँप डाऊनलोड केलेले ८,९१४+ ११,२४१ कुटुंबातील सदस्य

सोलापूर विभाग - एकूण रेल्वे कर्मचारी १०,१४८ - अँप  डाउनलोड केलेले ९,३८८ + १२,३०९ कुटुंबातील सदस्य

------------------------------------------------------

एकूण = रेल्वे कर्मचारी १,००,३३६  - अँप डाउनलोड ९२,७०४ + १,०८,७३८ कुटुंबातील सदस्य.

------------------------------------------------------

टॅग्स :रेल्वेआरोग्यकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस