मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पादचारी पूलावरून चालण्याचा हक्क प्रवाशांचा असल्याची जाणीव रेल्वे प्रशासन आणि महापालिकेला झाली. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि पादचारी पूलांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे आणि पालिका यांनी एकत्रित येत कारवाई करायला सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी २४ वॉर्डच्या अधिकाºयांना नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकाºयांचे रेल्वे मोबाईल क्रमांक रेल्वेकडे देण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकांलगत पालिका हद्दीतही १५० मीटर क्षेत्र हे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करणार आहे.फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रेल्वे आणि पालिका प्रशासन संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी रेल्वे हद्दीप्रमाणे पालिका हद्दीतही रेल्वे स्थानकातील १५० मीटर क्षेत्र ना फेरावाला क्षेत्र म्हणून घोषित करणार आहे. शिवाय फेरीवाल्यांवर आकारण्यात येणाºया दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. कारवाई करण्यासाठी पालिकेने २४ वॉर्ड अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. अधिकाºयांनी कारवाईस कुचराई केल्यास अतिरिक्त पालिका आयुक्तांकडे दाद मागण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अधिकाºयांचे मोबाईल क्रमांक रेल्वे प्रशासनाकडे देण्यात आले आहे.बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवर १६ ठिकाणी पादचारी पूलाची तरतूद करण्यात आला आहे. यापैकी १२ स्थानकांवर नवीन आणि ४ स्थानकांवरील पादचारी पूलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पादचारी पुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्यानंतर १२ नव्या पादचारी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. ४ जुन्या पादचारी पुलांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी दिली.स्थानकातील उपलब्ध जागेत प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. प्रत्येक स्थानकातील उपलब्ध जागा आणि प्रवासी संख्येनूसार स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील पाण्याचा प्रश्नही या बैठकीत सोडवण्यात आला आहे. निर्णयानूसार पालिका २० लाख लीटर पाणी देण्यात येणार आहे. टर्मिनसवरील पाण्याची मागणी ही २५ लाख लीटर प्रतिदिन इतकी आहे.>दुर्घटनेनंतर हायपॉवर समितीचा पहिला आढावारेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानूसार प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मल्टी डिस्पिलनरी समिती स्थापन करण्यात आली होती. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानूसार समितीची बैठक सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सीएसएमटी रेल्वे मुख्यालयात पार पडली. यावेळी मध्य रेल्वे व्यवस्थापक डी.के.शर्मा, पश्चिम रेल्वे व्यवस्थापक ए.के.गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, पोलीस आयुक्त दता पडसळगीकर, मध्य विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के.जैन, पश्चिम विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन, मुख्य सुरक्षा आयुक्त ए.के.श्रीवास्तव हे उपस्थित होते.पत्री पुलाजवळ ३० मीटरच्या उड्डाणपुलाचे नियोजनमध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत-कसारा दरम्यान रूळांच्या क्रॉसिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे यार्ड रिमॉडेलिंगची कामांना गती मिळणार आहे. पत्री पुलाजवळ कसारा दिशेला ३० मीटरच्या उड्डाणपुलाच्या बांधण्याचे नियोजन आहे. परिणामी पत्री पुलाजवळील लोकल थांबा कायमचा दुर होणार आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी सांगितले.>येथे पादचारीपुल उभारणारदादर, मुलुंड, अंबिवली, टिटवाळा, वासिंद, आटगाव, कसारा, उल्हासनगर, वडाळा रोड, टिळक नगर, कुर्ला, गोवंडी, विक्रोळी, विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी
रेल्वेस्थानकांलगत ‘ना फेरीवाला क्षेत्र’, फेरीवाल्यांविरोधात रेल्वे-पालिका एकत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:32 AM