दादरच्या फलाट रुंदीकरणासाठी रेल्वे वाहतूकीत बदल, शुक्रवारपासून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवणार
By नितीन जगताप | Published: September 12, 2023 11:09 PM2023-09-12T23:09:01+5:302023-09-12T23:15:09+5:30
१५ सप्टेंबर पासून दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट १ चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर पासून दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
दादर स्थानकात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी दादर फलाट क्रमांक १ ची सध्याची लांबी २७० मीटर आणि रुंदी ७ मीटर आहे. सध्याची रुंदी ७ मीटरवरून १०. ५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुंदी अतिरिक्त ३. ५ मीटरने वाढेल. हे काम १५ सप्टेंबर शुक्रवार पासून सुरू होणार असून त्यासाठी १ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
रुंदी वाढल्याने फलाट क्रमांक १ चे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर पादचारी पुलाच्या पायऱ्यांची रुंदी वाढवणे सोपे होणार आहे. या फलाटावर नवीन एस्केलेटर बसवणे सुलभ होईल.सध्या दादर फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये २ पादचारी पूल आहेत. या रुंदीकरणाच्या कामासाठी दादर फलाट क्र १ वरून सुरू होणाऱ्या/समाप्त होणाऱ्या सर्व धीम्या लोकल (अप आणि डाऊन). चा विस्तार परळ उपनगरीय टर्मिनसपर्यंत करण्यात आला आहे. अशा प्रकारे दादरहून धीम्या गतीने धावणाऱ्या/टर्मिनेट गाड्यांच्या पुढील ११ जोड्या आता शुक्रवार पासून पुढील सूचने पर्यंत परळ स्थानकावरून निघतील/समाप्त होतील.
या लोकल सेवांवर परिणाम -
- ठाणे-दादर ८. ०७ वाजता दादरला पोहोचणारी ८. १३ वाजता परळला पोहोचेल आणि ८. १७ वाजता परळहून कल्याणसाठी निघेल.
- टिटवाळा-दादर ९. ३७ वाजता दादरला पोहोचणारी परळला ९. ४२ पोहोचेल आणि कल्याणसाठी ९. ४० वाजतापरळहून कल्याणसाठी निघेल .
- कल्याण-दादर १२. ५५ वाजता दादरला पोहोचणारी, १२. ५८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १३. ०१ वाजता निघेल.
- ठाणे-दादर १७. ५१ वाजता दादरला पोहोचणारी १७. ५४ वाजता परळला पोहोचेल आणि १७. ५६ वाजता परळहून डोंबिवली साठी निघेल.
- ठाणे-दादर १८. १० वाजता दादरला पोहोचणारी परळपर्यंत धावेल आणि १८. १३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १८. १५ वाजता निघेल.
- डोंबिवली-दादर १८. ३५ वाजता दादरला पोहोचेल, १८. ३८ वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी १८. ४० वाजता परळ निघेल.
- ठाणे-दादर १९. ०३ वाजता दादरला पोहोचणारी १९. ०६ वाजता परळला पोहोचेल आणि १९. ०८ वाजता परळ कल्याणसाठी निघेल.
- डोंबिवली-दादर १९. ३९ वाजता दादरला पोहोचणारी, १९. ४२ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी १९. ४२ वाजता निघेल.
- ठाणे-दादर १९. ४९ वाजता दादरला पोहोचणारी १९. ५२ वाजता परळला पोहोचेल आणि १९. ५४ वाजता परळ ठाणे साठी निघेल.
- कल्याण-दादर २०. २० वाजता दादरला पोहोचणारी, २०. २३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी २०. २५ वाजता निघेल.
- ठाणे-दादर २२. २० वाजता दादरला पोहोचणारी २२. २३ वाजता परळला पोहोचेल आणि २२. २५ वाजता परळ ठाणे साठी निघेल.