Join us

दादरच्या फलाट रुंदीकरणासाठी रेल्वे वाहतूकीत बदल, शुक्रवारपासून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवणार  

By नितीन जगताप | Published: September 12, 2023 11:09 PM

१५ सप्टेंबर पासून दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

मुंबई :  मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट १ चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे  १५ सप्टेंबर पासून दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

 दादर स्थानकात होणाऱ्या  गर्दीचे  व्यवस्थापन करण्यासाठी  प्रवाशांच्या सोयीसाठी दादर फलाट क्रमांक १ ची सध्याची लांबी २७० मीटर आणि रुंदी ७ मीटर  आहे. सध्याची रुंदी ७ मीटरवरून १०. ५  मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुंदी अतिरिक्त ३. ५ मीटरने वाढेल. हे काम  १५ सप्टेंबर शुक्रवार पासून सुरू होणार असून त्यासाठी १ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.  हे काम पुढील दोन  महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

  रुंदी वाढल्याने फलाट  क्रमांक १ चे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर पादचारी पुलाच्या पायऱ्यांची रुंदी वाढवणे  सोपे होणार आहे. या फलाटावर नवीन एस्केलेटर बसवणे सुलभ होईल.सध्या दादर फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये २ पादचारी पूल आहेत. या रुंदीकरणाच्या कामासाठी दादर फलाट क्र  १ वरून सुरू होणाऱ्या/समाप्त होणाऱ्या सर्व धीम्या  लोकल (अप आणि  डाऊन).  चा विस्तार परळ उपनगरीय टर्मिनसपर्यंत करण्यात आला आहे. अशा प्रकारे दादरहून धीम्या गतीने धावणाऱ्या/टर्मिनेट गाड्यांच्या पुढील ११ जोड्या आता शुक्रवार पासून पुढील सूचने पर्यंत परळ स्थानकावरून निघतील/समाप्त होतील.

 या लोकल सेवांवर परिणाम  -- ठाणे-दादर ८. ०७  वाजता दादरला पोहोचणारी ८. १३ वाजता परळला पोहोचेल आणि ८. १७ वाजता परळहून कल्याणसाठी निघेल.- टिटवाळा-दादर ९. ३७ वाजता दादरला पोहोचणारी परळला ९. ४२  पोहोचेल आणि कल्याणसाठी ९. ४०  वाजतापरळहून कल्याणसाठी निघेल .- कल्याण-दादर १२. ५५  वाजता दादरला पोहोचणारी, १२. ५८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १३. ०१ वाजता निघेल.- ठाणे-दादर १७. ५१ वाजता दादरला पोहोचणारी १७. ५४ वाजता परळला पोहोचेल आणि १७. ५६ वाजता परळहून डोंबिवली साठी निघेल.- ठाणे-दादर १८. १० वाजता दादरला पोहोचणारी परळपर्यंत धावेल आणि १८. १३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १८. १५  वाजता निघेल.- डोंबिवली-दादर १८. ३५  वाजता दादरला पोहोचेल, १८. ३८ वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी १८. ४०  वाजता परळ निघेल.- ठाणे-दादर १९. ०३  वाजता दादरला पोहोचणारी १९. ०६  वाजता परळला पोहोचेल आणि १९. ०८  वाजता परळ कल्याणसाठी निघेल.- डोंबिवली-दादर १९. ३९  वाजता दादरला पोहोचणारी, १९. ४२  वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी १९. ४२ वाजता निघेल.- ठाणे-दादर १९. ४९ वाजता दादरला पोहोचणारी १९. ५२  वाजता परळला पोहोचेल आणि १९. ५४  वाजता परळ ठाणे साठी निघेल.- कल्याण-दादर २०. २०  वाजता दादरला पोहोचणारी, २०. २३  वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी २०. २५  वाजता निघेल.- ठाणे-दादर २२. २०  वाजता दादरला पोहोचणारी २२. २३  वाजता परळला पोहोचेल आणि २२. २५  वाजता परळ ठाणे साठी निघेल. 

टॅग्स :लोकलरेल्वेमुंबईदादर स्थानक