मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मुख्य मार्गावरील बिघाडांची मालिका सुरु असताना शनिवारी पश्चिम रेल्वेनेही ‘मरे’ची री ओढली. शनिवारी प.रेल्वेवर दुुपारच्या सुमारास वांद्रे आणि माहीमदरम्यान सिग्नलयंत्रणा बिघडल्याने अप धीम्या मार्गावरील वाहतूक वीस मिनिटे उशीराने सुरु होती. त्यामुळे अप धीम्या मार्गावर गांड्याच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या बऱ्याच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. दुरुस्तीच्या कामानंतर वाहतूक सुरळीत होईल असा दावा पश्चिम रेल्वे केला होता मात्र प्रत्यक्षात पश्चिम रेल्वेनेही उशिराने काम सुरू केले. दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो, तरीही तिन्ही रेल्वेमार्गांवरील बिघांडाचे प्रमाण वाढतच असल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे.एकाचा लोकल अपघातात मृत्यूसकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव स्थानकात फलाट क्रमांक दोनवर ग्लानी आल्याने २७ वर्षीय जलील खान हा तरुण रुळावर पडला. त्याचवेळी, चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या धडकेने तो गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
रेल्वेचे रडगाणे सुरुच
By admin | Published: February 07, 2016 1:27 AM