जनजागृतीसाठी रेल्वेचे ‘बाहुबली’ला; तर मुंबई पोलिसांचे ‘हल्क’ला साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:38 AM2018-08-11T01:38:48+5:302018-08-11T01:38:51+5:30

जनजागृतीसाठी लोकप्रिय पात्रांचा वापर करण्याची शक्कल रेल्वेसह मुंबई पोलिसांनी लढवली आहे.

Railway's 'Bahubali' for public awareness; Mumbai Police's 'Hulk' | जनजागृतीसाठी रेल्वेचे ‘बाहुबली’ला; तर मुंबई पोलिसांचे ‘हल्क’ला साकडे!

जनजागृतीसाठी रेल्वेचे ‘बाहुबली’ला; तर मुंबई पोलिसांचे ‘हल्क’ला साकडे!

Next

- महेश चेमटे 
मुंबई : जनजागृतीसाठी लोकप्रिय पात्रांचा वापर करण्याची शक्कल रेल्वेसह मुंबई पोलिसांनी लढवली आहे. मुंबईकरांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी मध्य रेल्वेने बाहुबली चित्रपटातील मूळ पात्राच्या पोस्टरचा वापर केला आहे तर हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन दुचाकीस्वारांना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चक्क ‘हल्क’ या काल्पनिक पात्राचा वापर केला आहे.
राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासनाला आहे. मात्र कारवाईपूर्वी जनजागृतीसाठी मध्य रेल्वेने सुपरहिट ऐतिहासिक ‘बाहुबली’ चित्रपटातील मूळ पात्र अमरेंद्र बाहुबलीच्या पोस्टरचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय फलाटांवरून मेल-एक्स्प्रेस फलाटाकडे जाताना मध्यभागी प्लॅस्टिक क्रशरजवळ हे पोस्टर लावले आहे. ‘या स्थानकावर प्लॅस्टिकच्या वापरास मनाई आहे.
आपल्या जवळील प्लॅस्टिकची रिकामी बॉटल या मशीनमध्ये
टाका,’ असा मजकूर लिहिलेले
आणि ही माझी आज्ञा आहे,
असे सांगणारे बाहुबलीचे पोस्टर
आहे.
दुसरीकडे अपघातात डोक्याला इजा होऊ नये यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
मात्र, अनेक दुचाकीस्वार याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच जागृीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून ‘अव्हेंजर’ या इंग्रजी चित्रपटातील ‘हल्क’ या पात्राचा
वापर केला आहे. ‘तुम्ही कितीही शक्तिशाली असलात तरी हेल्मेट घालणे विसरू नये,’ या आशयाचा मजकूर लिहून फोटो टिष्ट्वट केला
आहे. रेल्वे, मुंबई पोलिसांनी केलेला हा अनोखा प्रयोग सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.
>नागरिकांच्या स्मृती जागवून
संदेश दिल्यास फायदेशीर
रेल्वे स्थानकांवर किंवा फेसबूक, टिष्ट्वटर यांसारख्या समाजमाध्यमांवर नेटकरी अधिक रमतात. त्यातच लोकप्रिय पात्रांचा वापर केल्यामुळे संदेश जनतेपर्यंत लवकर पोहोचण्यास, त्यांच्यापर्यंत थेट भिडण्यास मदत होते. शिवाय साध्या भाषेत संदेश दिल्यास त्याच्याकडे लक्ष वेधले जाईलच असे नाही. मात्र, कल्पकतेने आवडती चित्रे, व्हिडीओंचा वापर केल्यास त्यांच्या तो संदेश चटकन लक्षात राहतो. त्यामुळे जनजागृतीसाठी त्यांचा प्रभावीपणे वापर करणे हे जागरूकतेचे लक्षण आहे.
- आनंद मुरुगकर,
तज्ज्ञ, समाजमाध्यम, टिष्ट्वटर ट्रेंड

Web Title: Railway's 'Bahubali' for public awareness; Mumbai Police's 'Hulk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.