भाडेवाढीचा रेल्वेचा विचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:36+5:302021-01-08T04:16:36+5:30
नवी दिल्ली : प्रवासी भाडेवाढीसंदर्भात कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वेने दिले आहे. काही माध्यमांनी रेल्वे प्रवासी भाडे वाढण्याची ...
नवी दिल्ली : प्रवासी भाडेवाढीसंदर्भात कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वेने दिले आहे.
काही माध्यमांनी रेल्वे प्रवासी भाडे वाढण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ते तथ्यहीन आहे. रेल्वे भाडेवाढीचा विचार नाही, असे सोमवारी निवेदनाद्वारे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वेने गेल्या वर्षी १ जानेवारीला प्रति किलोमिटर चार पैशांची वाढ केली होती. एसी १, २, ३, चेअरकार, एक्झिक्युटिव्ह श्रेणीसह स्लिपर आणि जनरल श्रेणीच्या बेसिक भाड्यात तेव्हा वाढ केली होती. मेल-एक्सप्रेसच्या स्लीपर श्रेणीत दोन पैसे प्रति किलोमीटरची दरवाढ झाली होती.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दीर्घकाळ रेल्वे सेवा ठप्प असल्याने रेल्वेला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.