Join us  

Carnac Bridge: १५४ वर्षांचा कर्नाक पूल पाडण्यासाठी रेल्वे सज्ज, असं असेल लोकलचं वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 9:31 AM

Carnac Bridge: कर्नाक उड्डाणपूल मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई : कर्नाक उड्डाणपूल मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल धोकादायक ठरविण्यात आला होता. मध्य रेल्वे २७ तसेच ब्लॉक घेऊन हा पूल पडणार आहे. 

 मनुष्यबळ कामगार - ४०० अधिकारी  - ३० ते ३५  सुपरवायझर  - १०० प्रत्येक शिफ्टला हेल्पर ५०  गॅस कटरचा वापर  एकूण ३०० गॅस सिलिंडर वापरणार  एकूण चार क्रेन तैनात  तीन क्रेन - ३५० टन क्षमतेच्या  एक क्रेन ५०० टन क्षमतेची  

मध्य रेल्वेसीएसएमटीवरून शेवटची गाडी कधी  धीमी खोपोली : रात्री १०. २८ जलद खोपोली : रात्री ९. ५८अप दिशेची शेवटची गाडी कधी (भायखळ्यापर्यंत)धीमी : बदलापूर ते सीएसएमटी -२२. ४८जलद : कर्जत- सीएसएमटी - २२. २८हार्बर रेल्वे सीएसएमटीवरून शेवटची गाडी कधी  वांद्रे : रात्री १०.३८ ;पनवेल : रात्री ९.५८सीएसएमटीकडे  शेवटची गाडी कधी (वडाळापर्यंत) पनवेल ते सीएसएमटी : रात्री १०.१६गोरेगाव ते सीएसएमटी : रात्री १०.२०

मुलुंड आणि ठाणेदरम्यान विशेष पॉवर ब्लॉकमुंबई : कोपरी येथे सुरू होणाऱ्या रस्ते उड्डाणपुलासाठी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री १:३० ते ३:४५ यावेळेत मुलुंड आणि ठाणे दरम्यान गर्डर्ससाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे ५०० आणि ७०० मेट्रिक टन या दोन क्रेनच्या साहाय्याने मुलुंड आणि ठाणेदरम्यान कोपरी येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर घेण्यासाठी सर्व सहा मार्गांवर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. यामुळे मेल एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. कोणार्क एक्स्प्रेस ३:०९ ते ३:५ या वेळेत ठाणे येथे नियमित केली जाईल. शालीमार एक्स्प्रेस ठाणे येथे  ३:३३ ते ३:४५   या वेळेत नियमित केली जाईल, ती निर्धारित वेळेच्या ५५ मिनिटे उशिरा पोहोचेल. हावडा - मुंबई सीएसएमटी मेल वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचेल.

 

 

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई उपनगरी रेल्वे