रेल्वेने नियोजनासाठी मेट्रो पॅटर्न अवलंबावा: मधू कोटीयन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:16 AM2021-08-10T10:16:58+5:302021-08-10T10:17:11+5:30

गर्दी कमी करण्यासाठी काही स्थानकात ४ प्रवेशद्वार आहेत ते बंद करून एकच ठेवावे त्यामुळे प्रवाशांना शिस्त लागेल. त्यासाठी मेट्रो पॅटर्न वापरला पाहिजे.

Railways should adopt metro pattern for planning: Madhu Kotian | रेल्वेने नियोजनासाठी मेट्रो पॅटर्न अवलंबावा: मधू कोटीयन

रेल्वेने नियोजनासाठी मेट्रो पॅटर्न अवलंबावा: मधू कोटीयन

googlenewsNext

रेल्वेने काय भूमिका घ्यायला हवी ?
रेल्वेने राज्य सरकारशी चर्चा करून सकाळच्या कामासाठी जाणारे आणि सायंकाळच्या घरी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दी बाबत नियोजन करावे. पुर्ण क्षमतेने गाड्या सुरु कराव्यात. कामाच्या वेळात बदल करण्यात यावा त्यामुळे रेल्वेतील गर्दी कमी होईल . तसेच गर्दी कमी करण्यासाठी काही स्थानकात ४ प्रवेशद्वार आहेत ते बंद करून एकच ठेवावे त्यामुळे प्रवाशांना शिस्त लागेल. त्यासाठी मेट्रो पॅटर्न वापरला पाहिजे.

रेल्वे प्रवाशांना काय आवाहन कराल?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. आता रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात असली तरी कोरोनाचे संकट गेलेले नाही याचे सर्वानी भान ठेवावे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. मास्क ,सॅनिटारझर आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री पाळावी.

राज्य सरकारने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे त्याबद्दल काय सांगाल ?
राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत करतो. पण हा निर्णय अगोदर घेतला गेला असता तर १५ ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागली नसती. घोषणा करण्यापूर्वी तयारी केली असती तर एक आठवडा आधी प्रवास केला असता. तीन महिन्यापूर्वी हा निर्णय घेतला असता तर ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस घेता आला असता. त्यांना प्रवासाची संधी मिळाली असती. उशीर झाला असला तरी चांगला निर्णय आहे.

सरकारच्या निर्णयाचा फायदा किती जणांना होणार ?
ज्याचे वय १८ ते ४४ दरम्यान आहे, असे हजारो लोक आहेत. त्यांनी नोकरी किंवा धंद्यांची सुरवात केली आहे. त्यांच्यावर फार मोठा अन्याय होणार आहे. त्यांचे दोन डोस पूर्ण न झाल्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास करता येणार नाही. तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. जर दोन महिने आधी निर्णय घेतला असता तर प्रवासी संख्या ४० लाख पर्यंत गेली असती पण आता केवळ १९ लाख जणांना फायदा होणार आहे.
    (मुलाखत : नितीन जगताप)

Web Title: Railways should adopt metro pattern for planning: Madhu Kotian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.