Join us

रेल्वे वायफायसाठी पैसे मोजावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:06 AM

मुंबई : रेल्वेस्थानकात आल्यानंतर मोफत वायफाय वापरासाठी काहीजण बराच वेळ स्थानकात रेंगाळतात. मात्र आता प्रवाशांना वायफायसाठी शुल्क भरावे लागणार ...

मुंबई : रेल्वेस्थानकात आल्यानंतर मोफत वायफाय वापरासाठी काहीजण बराच वेळ स्थानकात रेंगाळतात. मात्र आता प्रवाशांना वायफायसाठी शुल्क भरावे लागणार आहे. ‘रेल टेल’च्या योजनेनुसार दिवसाला ३० मिनिटे मोफत वायफाय वापरता येईल. त्यानंतर पुढील कालावधीसाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतील.

‘रेल टेल’ने ३० मिनिटांपर्यंतच मोफत वायफाय सेवा देताना त्यानंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ध्या तासानंतर प्रवासी मोफत वायफाय वापरू शकत नाही. त्याला सेवा हवी असल्यास ‘रेल टेल’ने दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा लागेल. दिलेल्या योजनेतील एकाची निवड केल्यास स्थानकात आल्यावर अर्ध्या तासानंतर शुल्क लागू होईल, अशी माहिती रेल टेलकडून देण्यात आली. सध्या देशभरातील चार हजार स्थानकांत रेल टेलची वायफाय सेवा उपलब्ध असून यात मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही योजना तत्काळ लागू करण्यात आली आहे. अर्ध्या तासानंतर पाच जीबीसाठी दिवसाला १० रुपये, १० जीबीसाठी १५ रुपये, १० जीबी ५ दिवसांसाठी १५ रुपये, २० जीबी ५ दिवसांसाठी ३० रुपये, २० जीबी १० दिवसांसाठी ४० रुपये, ३० जीबी १० दिवसांसाठी ५० रुपये तर, ६० जीबी ३० दिवसांसाठी ७० रुपये आकारण्यात येतील.

प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि त्यांना इंटरनेटवरील माहितीही विनाअडथळा व वेगाने मिळू शके ल या उद्देशाने देशभरातील ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्याची घोषणा माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यानुसार, गूगल व रेल टेल यांनी मिळून २०१५ मध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली होती.

......................