पुन्हा पाऊस; आजपासून चार दिवस कोसळधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:02 AM2021-08-02T04:02:06+5:302021-08-02T04:02:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान ...

Rain again; Four days from today | पुन्हा पाऊस; आजपासून चार दिवस कोसळधारा

पुन्हा पाऊस; आजपासून चार दिवस कोसळधारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीवरही पोहोचेल. गोवा आणि गुजरात किनारीही वेगाने वारे वाहणार असून, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनारी चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील. याच काळात महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधारा कोसळतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. या काळात मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ३ ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ४ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी रायगड आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत याच काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Rain again; Four days from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.