मुंबईत पुन्हा पाऊस पण जोर कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:51+5:302021-06-16T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असे करत करत मोठा ब्रेक घेतलेल्या पावसाने मंगळवारी मुंबईत पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असे करत करत मोठा ब्रेक घेतलेल्या पावसाने मंगळवारी मुंबईत पुन्हा एकदा हजेरी लावली. नेहमीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाची भूरभूर सुरू होती.
तीन दिवसाच्या फरकाने पाऊस दाखल झाल्याने वातावरणात किंचित गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रासलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, कोकण, गोव्यात काही ठिकाणी गेल्या २४ तासात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
१६ जून रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
...............................