Join us  

मुंबईसह कोकणाला पावसाचा अलर्ट; चार-पाच दिवसांत जोर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:43 AM

पुढील चार-पाच दिवसांत जोर वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून का होईना पावसाच्या सरी कोसळत असताना आता राज्यात सक्रिय झालेला मान्सून पुन्हा एकदा चांगला पाऊस घेऊन येईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे पेरणी करून बसलेल्या बळिराजाला दिलासा मिळणार असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पाऊस पडला तर धरणांची पाण्याची पातळी वाढण्यासह पिकांनादेखील पोषक वातावरण तयार होणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार-पाच दिवसांत कोकणासह मध्य भारतातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील भागात १९ आणि २० जुलैला चांगला पाऊस पडेल. १८ जुलैला बंगालच्या उपसागरात आणखी एक प्रणाली येत आहे. त्यामुळे पावसाची चिन्हे वाढण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. विशेष म्हणजे मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यात मुसळधारचा इशारा आहे.

रविवार ठरला पावसाचा...     मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी अधूनमधून का होईना पावसाच्या सरी कोसळत होत्या.      रविवारी पहाटेच मुंबईच्या पूर्व उपनगरात किंचित का होईना जोरदार सरींनी हजेरी लावली.      दुपारी तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला, तर संध्याकाळी दाटून आलेल्या ढगांनी काळोख केला मात्र मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत होते.

१७ जुलै : पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.१८ जुलै : रायगड, पुणे आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.१९ आणि २० जुलै : पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई शहर         २.७७ मिमीपूर्व उपनगरे         ५.३९ मिमीपश्चिम उपनग    ६.३४ मिमी

टॅग्स :मुंबईपाऊस