लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दाखल होताक्षणीच मुंबईला दणके देणारा मान्सून आता मात्र मुंबापुरीसोबत पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. सातत्याने ब्रेक घेणारा मान्सून अधूनमधून दणक्यात दाखल होत असून, मुंबईकरांना धडकी भरवत आहे. शुक्रवारी दुपारी दाखल झालेल्या पावसाने जोरदार मारा सुरू केल्याने काही काळ का हाेईना, मुंबईकरांना धडकी भरली होती.
मुंबईतून पाऊस अचानक गायब होत असून, अचानक दाखल होत आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जाेरदार हजेरी लावली. दुपारी २ ते ३ वाजताच्यादरम्यान वाऱ्याच्या वेगाने दाखल झालेल्या पावसाने रुद्रावतार दाखविण्यास सुरुवात केली. तब्बल अर्धा ते पाऊण तास जाेरदार पाऊस पडला. दुपारी चारनंतर मात्र त्याने घेतलेली विश्रांती सायंकाळपर्यंत कायम असल्याचे चित्र होते. पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
................................