सर आली धावून, प्रदूषण गेले वाहून; मुंबई शहर-उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक

By सचिन लुंगसे | Published: January 10, 2024 07:24 PM2024-01-10T19:24:28+5:302024-01-10T19:24:41+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास पडलेल्या हलक्या पावसाने प्रदूषणाचा कहर कमी केला आहे.

rain came and pollution gone; Air quality in Mumbai city-suburbs is satisfactory | सर आली धावून, प्रदूषण गेले वाहून; मुंबई शहर-उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक

सर आली धावून, प्रदूषण गेले वाहून; मुंबई शहर-उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास पडलेल्या हलक्या पावसाने प्रदूषणाचा कहर कमी केला आहे. पावसाने वातावरणातील धूलीकण जमिनीवर बसल्याने बुधवारी मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचे प्रमाण रोजच्या तुलनेत कमी नोंदविण्यात आले आहे. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश ठिकाणी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला आहे.

इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे, पूलांच्या कामांसह मुंबईतल्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होते आहे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने रस्त्यांवर पाणी मारण्यासह विविध उपाय योजले आहेत. यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना इमारतीच्या बाहय भागांवर कापड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय भुयारी मेट्रोचे काम सुरु असतानाच धूळ उडू नये म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही घटनास्थळी उपाय योजले. मात्र काही केल्या प्रदूषण कमी होत नसतानाच पडलेल्या पावसाने प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
----------
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
ठिकाण - निर्देशांक - दर्जा
बेलापूर - ७१ - समाधानकारक
भिवंडी - ११२ - मध्यम
कल्याण - ६३ - समाधानकारक
मीरा भाईंदर - ९६ - समाधानकारक
बीकेसी - ८४ - समाधानकारक
बोरीवली - ७४ - समाधानकारक
भायखळा - ५८ - समाधानकारक
चकाला - ७७ - समाधानकारक
चेंबूर - ८६ - समाधानकारक
आंतरराष्ट्रीय विमानतळ - ७३ - समाधानकारक
कुलाबा - ६० - समाधानकारक
घाटकोपर - ६९ - समाधानकारक
कांदिवली - ६१ - समाधानकारक
भांडूप - ७९ - समाधानकारक
मालाड - १५२ - मध्यम
माझगाव - १०६ - मध्यम
मुलुंड - ५७ - समाधानकारक
पवई - ९६ - समाधानकारक
शिवडी - ५६ - समाधानकारक
वरळी - १४७ - मध्यम
सायन - ८३ - समाधानकारक
विलेपार्ले - ८६ - समाधानकारक

 

Web Title: rain came and pollution gone; Air quality in Mumbai city-suburbs is satisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.