मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास पडलेल्या हलक्या पावसाने प्रदूषणाचा कहर कमी केला आहे. पावसाने वातावरणातील धूलीकण जमिनीवर बसल्याने बुधवारी मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचे प्रमाण रोजच्या तुलनेत कमी नोंदविण्यात आले आहे. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश ठिकाणी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला आहे.इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे, पूलांच्या कामांसह मुंबईतल्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होते आहे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने रस्त्यांवर पाणी मारण्यासह विविध उपाय योजले आहेत. यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना इमारतीच्या बाहय भागांवर कापड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय भुयारी मेट्रोचे काम सुरु असतानाच धूळ उडू नये म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही घटनास्थळी उपाय योजले. मात्र काही केल्या प्रदूषण कमी होत नसतानाच पडलेल्या पावसाने प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.----------हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांकठिकाण - निर्देशांक - दर्जाबेलापूर - ७१ - समाधानकारकभिवंडी - ११२ - मध्यमकल्याण - ६३ - समाधानकारकमीरा भाईंदर - ९६ - समाधानकारकबीकेसी - ८४ - समाधानकारकबोरीवली - ७४ - समाधानकारकभायखळा - ५८ - समाधानकारकचकाला - ७७ - समाधानकारकचेंबूर - ८६ - समाधानकारकआंतरराष्ट्रीय विमानतळ - ७३ - समाधानकारककुलाबा - ६० - समाधानकारकघाटकोपर - ६९ - समाधानकारककांदिवली - ६१ - समाधानकारकभांडूप - ७९ - समाधानकारकमालाड - १५२ - मध्यममाझगाव - १०६ - मध्यममुलुंड - ५७ - समाधानकारकपवई - ९६ - समाधानकारकशिवडी - ५६ - समाधानकारकवरळी - १४७ - मध्यमसायन - ८३ - समाधानकारकविलेपार्ले - ८६ - समाधानकारक