Join us

वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:28 PM

घरगुती वीज ग्राहकांना २ टक्के सवलत

मुंबई : जुन महिन्यात आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच आता वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महावितरणने केला आहे. घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात प्रचलित १ टक्क्यांऐवजी २ टक्के सवलत देण्यात यावी, अशा आशायाच्या सूचनाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या असून, याबाबत परिपत्रक देखील आता जारी करण्यात आले आहे.लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना हिवाळ्यातील म्हणजे मागील तीन महिन्यांच्या म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यातील वीज वापरानुसार सरासरी वीज बिले वितरित करण्यात आली. घरगुती ग्राहकांच्या वीज वापरात या कालावधीत वर्क फॉर्म होम व ऊन्हाळ्यातील तापमानातील बदलामुळे अधिक वीज वापरा करणात्सव वीज बिलात वाढ झाली आहे. जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडिंगनुसार देण्यात आलेल्या वीज बिलातील यामुळे वाढ नोंदविण्यात आली आहे. आणि हेच ग्राहकांना विविध माध्यमातून समजावून सांगितले जात आहे.  परिणामी आता वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचे एप्रिल, मे महिन्याचे वीज बील सरासरी देण्यात आले. आणि जुन महिन्याचे वीज बिल प्रत्यक्ष मीटर वाचनाप्रमाणे आले, अशा ग्राहकांनी त्यांचे संपुर्ण वीज बिल थकबाकीसह मुदतीमध्ये भरले तर त्यांना जून महिन्याच्या चालू वीज बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के परतावा जुलै महिन्याच्या वीज बिलातून केला जाईल.  ज्या घरगुती ग्राहकांचे एप्रिल, मे आणि जून महिन्याचे प्रत्येकी वीज बिल सरासरी वापरानुसार दिले. आणि त्यानंतर जुलै महिन्यात वीज बिल प्रत्यक्षत मीटर वाचनाप्रमाणे होईल, अशा ग्राहकांनी त्यांचे संपुर्ण वीज बिल थकबाकीसह मुदतीमध्ये भरले तर त्यांना जुलै महिन्याच्या चालू वीज बिलाची भरणा रक्कम २ टक्के सवलतीसह दर्शविली जाईल......................हे ग्राहकदेखील सवलतीस पात्रज्या ग्राहकंचे वीज बिलाचे वाद न्यायालयात, विविध मंचाकडे न्याय प्रविष्ठ आहेत. न्यायालयाने, मंचाने सदर रक्कम भरण्यास स्थगिती आदेश दिला आहे, अशा ग्राहकांनी वादातीत वीज बिल रक्कम वगळून बाकी वीज बिल संपुर्ण भरले असेल तर असे ग्राहकदेखील सवलतीस पात्र राहतील. अशा ग्राहकांची नोंद वादातीत रक्कमेसह बिलिंग प्रणालीत विना विलंब करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत......................तीन हप्त्यात भरा वीज बिलज्या ग्राहकांना जून महिन्याचे वीज बिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे आहे. अशा ग्राहकांना ते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चालू बिलासहित भरता येईल. ज्या ग्राहकांना जुलै महिन्याचे वीज बिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे आहे. अशा ग्राहकांना हे हप्ते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चालू वीज बिलासहित भरता येतील......................

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक