मुंबईला पाऊस तडाखा, रायगडमध्ये जोरधार, ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:41 AM2020-07-16T03:41:34+5:302020-07-16T06:15:01+5:30

ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक नसला, तरी पुढील तीन दिवसांचा अंदाज लक्षात घेऊन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Rain hit Mumbai, heavy rains in Raigad, disaster management ready in Thane district | मुंबईला पाऊस तडाखा, रायगडमध्ये जोरधार, ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन सज्ज

मुंबईला पाऊस तडाखा, रायगडमध्ये जोरधार, ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन सज्ज

Next

मुंबई : मध्यरात्रीपासून कोेसळणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांना झोडपून काढले. दाटून आलेल्या ढगांमुळे अंधारलेले वातावरण, सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट अशा वातावरणात कोसळलेल्या पावसाने सखल भागात पाणी तुंबले आणि कोरोनाच्या साथीमुळे आधीच ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुंबईकरांना वरूणराजाचा तडाखाही सहन करावा लागला.
ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक नसला, तरी पुढील तीन दिवसांचा अंदाज लक्षात घेऊन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतही दिवसभर पावसाची संततधार होती. त्या तुलनेत पनवेलमध्ये मात्र पावसाचा जोर अधिक होता. निसर्ग चक्रीवादळाचा धसका कायम असलेल्या रायगडमध्येही जोरदार सरी कोसळल्या. तेथे पुढील अंदाज लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज आहेत. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला आज आॅरेंज अर्लट
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला गुरुवारी आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यासाठी अंदाज
- १६ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार पाऊस पडेल. तर, तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- १६ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार पाऊस पडेल. तर, तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- १७ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

पावसाचा जोर गुरुवारी कमी होईल. मात्र मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार वारे वाहतील.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.

Web Title: Rain hit Mumbai, heavy rains in Raigad, disaster management ready in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.