Rain In Maharashtra: ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 10:41 AM2022-09-08T10:41:14+5:302022-09-08T10:41:44+5:30

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे.

Rain In Maharashtra: CM Eknath Shinde's instructions to provide immediate relief to those affected by cloudburst-like rain | Rain In Maharashtra: ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Rain In Maharashtra: ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next

मुंबई- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या  काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी    जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Web Title: Rain In Maharashtra: CM Eknath Shinde's instructions to provide immediate relief to those affected by cloudburst-like rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.