- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी दिवसा आणि रात्री पावसाने झोडपून काढले असून या काळात ११३.८ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस असून, रेकॉर्ड ब्रेक म्हणून हा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी सकाळी देखील मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या सर्व परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात सर्वाधिक पाऊस झाला असून, मुंबई महानगर प्रदेशात देखील पावसाने ऑक्टोबर महिन्यात आपला मारा कायम ठेवला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या हिटमुळे मुंबईकरांना घाम फुटला होता. सुरुवातीला उकाड्याने त्रस्त झालेला मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आता सुखावला आहे.
सतत पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे मुंबईच्या हवेत गारवा आला आहे. शिवाय येथील उकड्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात पावसाची सातत्याने धुवाधार बॅटिंग सुरू असून पुढील तीन दिवस मुंबईसह राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली केली आहे.कुठे झाला किती पाऊस / मिमीग्रँट रोड २२६दादर २०५मस्जिद बंदर १८४भायखळा १८१महालक्ष्मी १७७मरीन लाइन्स १७३डोंबिवली १६९कोपर खैरेने १४१सायन १४०वर्सोवा आणि विक्रोळी १३४चेंबूर १२८घणसोली १२५वांद्रे १२०बेलापूर ११९ऐरोली ११५सांताक्रूझ ११४देवनार ११३वाशी ११०अंधेरी १०९पवई १०८पनवेल १०६ठाणे १०४राम मंदिर ९४मुंब्रा ९४मुलुंड ८९विरार ८७पालघर ८७दहिसर ८५मानखुर्द ८२मालवणी ७७भाईंदर ६७बोरिवली ६५कांदिवली ६४वसई ५७डहाणू ५५( डेटा क्रेडिट : आय एम डी, मुंबई महापालिका आणि वेगरिज ऑफ दी वेदर )