मुंबई ढगाळ, ऐन हिवाळ्यात ‘पावसाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:50 AM2024-01-10T09:50:34+5:302024-01-10T09:51:37+5:30

मंगळवारी रात्री मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली आहे.

Rain in winter lashes in various district in mumbai | मुंबई ढगाळ, ऐन हिवाळ्यात ‘पावसाळा’

मुंबई ढगाळ, ऐन हिवाळ्यात ‘पावसाळा’

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे वारे, बांग्लादेशाहून वाहणारे वारे आणि अरबी समुद्रातील वातावरणात होत असलेल्या हवामान बदलामुळे मुंबई महानगर प्रदेशासह लगतचा परिसर ढगाळ नोंदविण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी सकाळीही मुंबईवर धुके राहील. दुपारी- सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

येत्या ५ दिवसांत हवामानात बदल अपेक्षित असून, मुंबईत ढगाळ वातावरण राहील. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते. 

पुन्हा थंडीला सुरुवात :

 ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात पाऊस पडेल.

 ११ जानेवारीपासून पावसाळी वातावरण निवळून किमान तापमानात घसरण होईल. त्यानंतर पुन्हा थंडीला सुरुवात होईल.

Web Title: Rain in winter lashes in various district in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.