मुंबई : समुद्रातील निवळलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबई शहर आणि उपनगराला झोडपणाºया पावसाने आता चांगलीच उसंत घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी कुलाबा आणि सांताक्रुझ या दोन्ही वेधशाळांमध्ये अनुक्रमे ० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, शुक्रवारी येथील आकाश अशंत: ढगाळ राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. ९, १० आणि ११ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.दरम्यान, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझडीच्या घटना सुरूच आहेत. शहरात एका ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असून, शहरात दोन आणि उपनगरात दोन अशी चार ठिकाणे झाडे कोसळली आहेत. सुदैवाने यात हानी झालेली नाही.
पावसाची शक्यताही धूसर; मुंबई नुसतीच ढगाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:39 AM