अलिबाग : रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसास सुरुवात झाली. रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील सर्व तालुक्यांत तर रत्नागिरी, गणपतीपुळेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही किनारी भागात अवकाळी पावसाने फटका दिला आहे. अरबी समुद्रात पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या २४ तासांत हवामान पूर्णपणे ढगाळ राहून कोकण किनारपट्टीत पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.सध्या कोकणातील एकूण आंबा उत्पादनापैकी ५० टक्के आंबा उत्पादन हाती येण्याचा काळ आहे. नेमक्या याच वेळी अवकाळी पाऊस आल्याने चिंतेची परिस्थिती असल्याची माहिती कोकणातील नामांकित आंबा उत्पादक बागायतदार तथा आंबा अभ्यासक डॉ. विवेक भिडे यांनी दिली आहे. उद्याही वातावरण ढगाळ राहिले तर आंब्याच्या मोहोरात पाणी मुरेल, त्यामुळे अॅन्थ्रोस नामक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळावर काळे डाग येऊन, आंब्याची प्रतवारी खाली येण्याची शक्यता भिडे यांनी व्यक्त केली आहे. कोकणात आंब्याला मोहोर आला आहे. मात्र पावसामुळे तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)नांदगाव : मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर जमिनीवर भातशेतीचे पीक घेतले जाते. त्यापैकी १४ हेक्टर जमिनीवर आंबा व सुपारी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पाऊस पडल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. आंबा पिकाला खूप चांगला मोहोर आला होता. त्यातच हा तुरळक पाऊस व ढगाळ वातावरणाने या पिकास धोका पोहचू शकतो.च्खालापूर : खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात दुपारनंतर सुरू झालेली पावसाची संततधार सायंकाळ उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. वीक एण्डसाठी आलेल्या पर्यटकांनी मात्र पावसाचा आनंद लुटला. च्गेल्या दोन दिवसांपासून तापमानात अचानक झालेल्या वाढीचा परिणाम आज दिवसभर जाणवला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र नागरिकांची व वीटभट्टी व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. कर्जतसह नेरळ, माथेरान येथेही पावसाने हजेरी लावली.च्कित्येक दिवसांपासून हवेत धुळीचे प्रमाण वाढले होते. मात्र पावसाने धुळीवर शिडकावा टाकला. धुके व रोगांतून वाचलेला आंब्याच्या झाडाचा मोहोर या पावसाने झडण्याची भीती रसायनी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी अनिवार्य च्मुरुड : हवामानात होणारा बदल, कमी-अधिक वाढणारे तापमान आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा आंबा पिकाला चांगला मोहोर आला आहे, मात्र किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आंबा सर्वेक्षणात आढळून आले आहे. मुरुड तालुक्यातील मोहोर आंबा पिकाच्या पाहणीअंती भुरी रोग, तुडतुडे रोग तसेच फळमाशांचा फैलाव झाल्याचे मुरुड तालुका कृषी अधिकारी दिलीप भड यांनी सांगितले. च्शेतकऱ्यांनी या किडीच्या बंदोबस्तासाठी भुरी रोग नियंत्रणासाठी कार्बेन डँझम १० ग्रॅम किंवा पाण्यात मिसळणारे २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच किडीच्या वाढीसाठी कोंदट हवामान व कमी सूर्यप्रकाश पोषक ठरतो. म्हणूनच बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्याची विरळणी करावी. एका मोहरावर ५ पेक्षा जास्त तुडतुडे आढळल्यास फेन व्हॅलरेट २० टक्के प्रवाही ५ मिमी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फ वारणी करावी, तर दुसरी फवारणी १५ दिवसांनी इमि डाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिमी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी. च्आंब्याच्या मोहराला सुगंध असतो. परिणामी, फळमाशी प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याकरिता रक्षक सापळे प्रति हेक्टरी ४ सापळे याप्रमाणे आंब्याच्या झाडाला बांधावे आणि त्याकरिता मिथिल युनीनॉलवर या गंध सापळ्याचा वापर केल्यास फळमाशी नियंत्रणात राहते. जिथे नवीन मोहोर आलेला आहे. त्या ठिकाणीही औषधांची फवारणी करण्याचे आवाहन पाहणी समितीतील कृषी पर्यवेक्षक एम. एस. सूर्यवंशी, पी. एच. बेंडाळे यांनी केले आहे.
जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप
By admin | Published: February 28, 2015 10:55 PM