मुंबई :रविवारी हजेरी लावलेल्या पावसाने उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे. पावसाची रिपरिप सुरू राहिल्यास मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहिम मतदारसंघातही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. या तीन मतदारसंघांतही सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये कार्यकर्ते धावपळ करताना दिसले. मतदारांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देतानाच आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान का करावे, हे कार्यकर्ते ठासून सांगत होते.
आपले मतदार कोण? ते शंभर टक्के मतदानासाठी यावे, यासाठी त्यांची सोय करणे, ज्येष्ठ मतदारांना केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी उचलली आहे. या नियोजनासाठी पक्षाचे नेते, उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकाही झाल्या.