मुंबईबाहेरील तलाव क्षेत्रात पावसाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:23+5:302021-07-18T04:06:23+5:30

पाणीकपातीची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तुळशी तलाव भरून ...

Rain showers in the lake area outside Mumbai | मुंबईबाहेरील तलाव क्षेत्रात पावसाची दांडी

मुंबईबाहेरील तलाव क्षेत्रात पावसाची दांडी

Next

पाणीकपातीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तुळशी तलाव भरून वाहू लागला. मात्र ठाणे जिल्ह्यातील प्रमुख तलाव क्षेत्रात तुरळक सरी पडत असल्याने पाण्याचे टेन्शन मुंबईत वाढत चालले आहे. परिणामी पुढच्या आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पंधरवड्यातही पावसाने निराशा केली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये आता केवळ दोन लाख ६२ हजार ८१५ दशलक्ष लिटर जलसाठा आहे. तर २०१९ मध्ये तलाव निम्मे भरले होते. २०२० मध्येही जुलैच्या पंधरवड्यापर्यंत तीन लाख ८१ हजार दशलक्ष लिटर जलसाठा होता.

महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. मात्र पावसाने दडी मारल्याने आता केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ही बाब मुंबईसाठी चिंताजनक आहे.

१७ जुलै २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ३२२११ १४९.५७

तानसा १२८.६३ ११८.८७ ४४२०३ १२२.५२

विहार ८०.१२ ७३.९२ २२११८.....७९.०७

तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२८

अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ०००...५९२.७१

भातसा १४२.०७ १०४.९० १३६७८६ ...११४.७५

मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १९४५१ ..२३८.८५

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ - २,६२,८१५

२०२० - ३,८१,१५३

२०१९- ७,१९,७७१

Web Title: Rain showers in the lake area outside Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.