मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील काही भागांत आणि मुंबईत पश्चिम उपनगर आणि कुलाबा परिसरात मंगळवारी सकाळी पावसाचा शिडकावा झाला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या २४ तासांत मुंबईसह राज्यातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी पडतील. पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.बोरीवली, कांदिवली, अंधेरी, कुलाबा या परिसरात मंगळवारी सकाळी पावसाचा शिडकावा झाला. बुधवारी मुंबईत हवामान ढगाळ असेल. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३२ आणि २४ अंश सेल्सियसच्या आसपास राहील. राज्यात ६ व ७ एप्रिलला कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत पावसाच्या तुरळक सरी
By admin | Published: April 06, 2016 5:05 AM