मुंबई : सप्टेंबर महिन्यातही मुंबईत मुक्कामी असलेल्या पावसाने मुंबईचे रस्ते खड्ड्यात घातले आहेत. त्यामुळे महापालिकेने अवघ्या पाच दिवसांपूर्वी सुरू केलेल्या मोबाइल अॅपवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. या तक्रारींचे प्रमाण दररोज सरासरी ७० हून अधिक असल्याचे उजेडात आले आहे. या खड्ड्यांनी मुंबईकरांची वाट मात्र बिकट केली आहे.२०११ मध्ये वॉईज आॅफ सिटिजन या संकेतस्थळावर यापूर्वी खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यात येत होत्या. मात्र यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडत असल्याने हे संकेतस्थळ २०१५ मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यासाठी हेल्पलाइनव्यतिरिक्त कोणतीही यंत्रणा नसल्याने हे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. पालिका प्रशासनाने १९ सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात ह्यट८ इटउ ढङ्म३ँङ्म’ी ऋ्र७्र३ह्ण हा अॅप आणला आहे.या अॅपवर पाच दिवसांमध्येच खड्ड्यांच्या सुमारे पावणेचारशे तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच सरासरी ७०हून अधिक तक्रारी दररोज येत आहेत. तक्रार आल्यानंतर ४८ तासांमध्ये तो खड्डा बुजविण्याची ताकीद ठेकेदार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येतात. मात्र पावसाच्या सरी अधूनमधून कायम असल्याने हे खड्डे तत्काळ बुजविणे आणि पुन्हा न उखडण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.अन्य प्राधिकरणांनाही अॅपद्वारे मिळते माहितीमुंबईत रस्ता कोणाच्याही अख्यातरीत असला तरी टीकेचे धनी महापालिकेला व्हावे लागते. मात्र या अॅपमध्ये महापालिकाच नव्हेतर, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणांकडेही त्यांच्या खड्ड्यांबाबत तक्रार पोहोचते़या अॅप अनुसार खड्ड्यांच्या सर्वाधिक ३४ तक्रारी अंधेरीपूर्व येथून आल्या आहेत. गोरेगाव येथून ३३ आणि कुर्ला येथील ३१ तक्रारींचा यात समावेश आहे.गेल्या सहा वर्षांच्याकालावधीत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने ११६ कोटी रुपये खर्च केले असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आले आहे.एक खड्डा भरण्यासाठी सरासरी १७ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
नवीन मोबाइल अॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:52 AM