Join us

कोकणासह मराठवाडय़ाला पावसाचा इशारा

By admin | Published: December 12, 2014 2:18 AM

पुढील 24 तासांत दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मुंबई : नैर्ऋत्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुढील 24 तासांत दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच मागील दोन दिवसांपासून उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. परिणामी राज्यातील प्रमुख शहरांसह मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. 
किमान तापमानात सरासरी 2 अंशाची वाढ नोंदविली असून, गुरुवारी राज्यात 
सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 12.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले.  हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे.  (प्रतिनिधी)