Join us

मुंबईत पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:49 AM

तब्बल पंधराएक दिवस मुंबई शहरासह उपनगराला झोडपून काढणाºया पावसाने आता विश्रांती घेतली आहे. श्रावण महिना सुरू झाला असला तरी श्रावण सरीही बेपत्ता असून, मुंबईवर केवळ नावाला पावसाचे ढग दाटून येत आहेत.

मुंबई : तब्बल पंधराएक दिवस मुंबई शहरासह उपनगराला झोडपून काढणाºया पावसाने आता विश्रांती घेतली आहे. श्रावण महिना सुरू झाला असला तरी श्रावण सरीही बेपत्ता असून, मुंबईवर केवळ नावाला पावसाचे ढग दाटून येत आहेत.दरम्यान, अधूनमधून कुठे तरी एखादी सर कोसळत असून, मागील २४ तासांतील नोंदीनुसार शहरात ५.१३, पूर्व उपनगरात ५.२८ आणि पश्चिम उपनगरात २.२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मान्सूनने विश्रांती घेतली असली तरी मुंबईतील पडझड कायम आहे. शहरात तीन ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शहरात १, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ७ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.दरम्यान, जोगेश्वरी पूर्व येथील सर्व्हिस रोडवरील नाल्यात पडून रोशन शिवधारी रावल (३२) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रावल यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाºयांनी रावल यांना मृत घोषित केले.तलावांची तहान भागलीमुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबापुरीला पाणीपुरवठा करणाºया सात तलाव क्षेत्रांत पावसाची हजेरी लागत आहे. मोडक सागर येथे १०, तानसा ५, विहार २४, तुलसी ८, अप्पर वैतरणा २४, भातसा ७ आणि मध्य वैतरणा १० मिलीमीटर पाऊस पडला आहे.तलाव पूर्ण आजचीपातळी पातळीमोडक सागर १६३.१५ १६३.१५तानसा १२८.६३ १२८.६१विहार ८०.१२ ७८.४५तुलसी १३९.१७ १३८.९९अ. वैतरणा ६०३.५१ ६०१.८०भातसा १४२.०७ १३६.३०म. वैतरणा २८५.०० २८३.१०