पावसाने झोडपले

By admin | Published: June 17, 2014 01:10 AM2014-06-17T01:10:14+5:302014-06-17T01:10:14+5:30

मुसळधार पावसाने आज नवी मुंबईसही झोडपले. सीवूड रेल्वे स्टेशनमधील ४५ फूट उंचीची संरक्षण भिंत पहाटे कोसळली.

The rain thundered | पावसाने झोडपले

पावसाने झोडपले

Next

नवी मुंबई : मुसळधार पावसाने आज नवी मुंबईसही झोडपले. सीवूड रेल्वे स्टेशनमधील ४५ फूट उंचीची संरक्षण भिंत पहाटे कोसळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. शहरात इतर ठिकाणीही वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभरात सरासरी ५८ मिलीमिटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. सीवूड येथे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम एल. अँड टी. कंपनी करत आहे. पहाटेच्या दरम्यान येथील ४५ फुटांची संरक्षण भिंत अचानक कोसळली. रात्री घटना घडली असल्यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही. पदपथापासूनचा भाग खचला असल्यामुळे एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. हा अपघात दिवसा झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. याविषयी माहिती घेण्यासाठी एल. अँड टी. कंपनीचे प्रशासकीय अधिकारी जय वील यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. दिवसभरात पालिकेच्या एकाही मोठ्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती.
कोपरखैरणेमध्ये वाहनांवर वृक्ष कोसळून वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात मागील दोन दिवसामध्ये नेरूळ, जुईनगर व इतर ठिकाणीही वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: The rain thundered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.