मुंबईत विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:03+5:302020-12-14T04:24:03+5:30

हवामान ढगाळ : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ...

Rain with thunderstorms in Mumbai | मुंबईत विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

मुंबईत विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

Next

हवामान ढगाळ : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारीही ढगाळ नोंदविण्यात आले. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

* आज मध्य महाराष्ट्र, काेकणात लावणार हजेरी

१४ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १५ ते १७ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

.......................

Web Title: Rain with thunderstorms in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.