Rain Update: गणेशोत्सवात पडणार पाऊस... बंगालच्या उपसागरात हवामान बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:01 AM2023-09-12T10:01:23+5:302023-09-12T10:01:50+5:30

Mumbai Rain Update: पावसाने किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Rain Update: Rain will fall on Ganeshotsav... Weather changes in Bay of Bengal | Rain Update: गणेशोत्सवात पडणार पाऊस... बंगालच्या उपसागरात हवामान बदल

Rain Update: गणेशोत्सवात पडणार पाऊस... बंगालच्या उपसागरात हवामान बदल

googlenewsNext

मुंबई - मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे पावसाने वेग पकडला असला तरी काही जिल्हे आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पावसाने किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मुंबई सलग तीन दिवस लागून राहिलेल्या पावसाने सोमवारी ब्रेक घेतला असला तरी महिन्याच्या मध्यातही पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.

बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रिय वान्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकतात. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाब क्षेत्रात होऊ शकते. त्यांच्या वायव्य दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे १५ सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२४ तासांतील पाऊस
शहर- ०.८१
पूर्व उपनगर - १.१७
पश्चिम उपनगर -०.८५

मुंबईत झालेला एकूण पाऊस - ८५.६५%
शहर आणि उपनगरातील पाऊस
शहर - ८५.१० टक्के
उपनगर - ८२.२३ टक्के

- सध्या पडत असलेल्या पावसाची तीव्रता ही १४ सप्टेंबरपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी कमी होईल.
- ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी केवळ मध्यम पावसाची शक्यता असेल.
- १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान ही शक्यता असू शकते. पहिली चक्रिय वाऱ्याची स्थिती १२ सप्टेंबरला तयार होण्याची शक्यता जाणवते, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. कायम आहे.
- संपूर्ण कोकणात जोरदार तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या ५ जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता

Web Title: Rain Update: Rain will fall on Ganeshotsav... Weather changes in Bay of Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.