आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 06:14 AM2024-08-01T06:14:38+5:302024-08-01T06:15:02+5:30

आतापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची यावेळी अपेक्षा  

rain will be active again in the state from today chance of moderate to heavy rain | आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. आज १ ऑगस्टला रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१ ते ४ ऑगस्ट या चार दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो. 

आतापर्यंत ओढ दिलेल्या प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. ५ ऑगस्टपासून  कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो.

 २ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
 ३ ऑगस्ट : ऑरेंज - नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा
 ४ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड

 

Web Title: rain will be active again in the state from today chance of moderate to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.