येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 08:55 PM2019-10-06T20:55:44+5:302019-10-06T22:00:42+5:30

मुंबईत येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain will fall with thunderstorms in the coming days, the Meteorological Department predicts | येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

Next

मुंबई- मुंबईत येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.

वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

Web Title: Rain will fall with thunderstorms in the coming days, the Meteorological Department predicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.