मुंबई - पाऊस सुरु झाल्यांनतर काही दिवसांनी वाहतूक पोलिसांना प्रशासनाने रेनकोट दिले आहेत़ परंतु त्या रेनकोटचा दर्जा चांगला नाही. ते एक पावसाळाही वापरता येणार नाहीत. या रेनकोटचा दर्जा सुधारायला हवा अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे.पावसात कर्तव्य बजावताना पोलिसांची प्रचंड गैरसोय होत होती. छत्री घेऊन काम करत असताना अडचण येत होती. पाऊस सुरु होण्यापूर्वी वाहतूक पोलिसांना रेनकोट देणे अपेक्षित होते. परंतु काही दिवस पावसात भिजल्यानतर त्यांना रेनकोट मिळाले आहेत. परंतु या रेनकोटचा दर्जा चांगला नसून वाहतूक पोलिसांनी रेनकोट घालून दुचाकीची किक मारली तर रेनकोट फाटतो असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.मुंबईत एकूण २८०० वाहतूक पोलीस आणि कर्मचारी आहेत. मुंबईमध्ये झालेल्या जलप्रलयामध्ये नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली होती. वाहतूक पोलीस पावसाळ्यात वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच पाण्यात अडकलेली वाहने काढणे, प्रवाशांना मदत करणे अशी अनेक कामे करत असतात. पावसात वाहतूक पोलिसांना रेनकोट दिले जातात.एक ते दोन महिन्यामध्येअनेकदा रेनकोट फाटतात. त्यामुळे आम्हाला स्वखचार्ने रेनकोट घ्यावे लागतात. पाऊस गेल्यांनतर १० मिनिटे दहा मिनिटेही तो रेनकोट अंगावर ठेऊ शकत नाही. खूप गरम होते. इतर रेनकोट १ किंवा दोन वर्ष जातात, परंतु हे रेनकोट एक पावसाळाही टिकत नाहीत, असेही वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात वाहतूक पोलीस आणि पोलीस यामधील फरक कळत नाही त्यामुळे पारदर्शक रेनकोट मिळायला हवेत अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतूक पोलिसांना रेनकोट देण्यात आले आहेत, परंतु रेनकोटच्या दजार्बाबत किंवा फाटण्याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असे ताडदेव वाहतूक पोलीस विभागाचे सुनील सोहनी यांनी सांगितले़पावसाळ्यात बूट नको सॅन्डल हवेत!पावसाळ्यात रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना बुटांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बुटांऐवजी सॅन्डल वापरण्याची सूट मिळावी, अशी वाहतूक पोलिसांची मागणी आहे.मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत सुमारे २८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. पावसाळ्यात वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच पाण्यात अडकलेली वाहने काढणे, प्रवाशांना मदत करणे अशी अनेक कामे ते करीत असतात. पोलिसांना काही तास पाण्यात उभे राहून काम करावे लागते.हे पाणी बुटामध्ये साचते. त्यामुळे पायाला संसर्ग होतो. पायाला भेगा पडून त्यातून रक्तही येते. परंतु वरिष्ठांकडून पोलिसांना बूट वापरण्याची सक्ती केली जाते. पावसाळ्यात काम करताना जर सॅन्डल असतील तर त्यामधून पाणी निघून जाईल आणि पायाला संसर्ग होणार नाही. त्यामुळे बूट ऐवजी सॅन्डल वापरण्याची परवानगी मिळावी, अशी वाहतूक पोलिसांची मागणी आहे.पोलिसांनी युनिफॉर्मची शिस्त पाळायला हवी. त्यांनी बूट घालणे आवश्यक आहे. जर एखाद्याच्या पायाला जखम झाली असेल, तर त्याला सॅण्डल वापरण्याची सूट दिली जाते. परंतु इतरांनी सॅण्डल वापरणे चुकीचे आहे. बूटांऐवजी सँडल वापरण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाऊ शकतो.- सोपान निघोत, पोलीस निरीक्षक,आझाद मैदान वाहतूक विभाग
दुचाकीला किक मारली तरी रेनकोट फाटतो, वाहतूक पोलिसांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 3:02 AM