मुंबईसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, जव्हारमध्ये अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:34 AM2019-04-15T06:34:38+5:302019-04-15T06:34:42+5:30

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई, उपनगर जिल्ह्यातील नागरिकांना रविवारी अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला.

Rainfall in Ambernath, Badlapur, Kalyan, Jawhar with Mumbai | मुंबईसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, जव्हारमध्ये अवकाळी पाऊस

मुंबईसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, जव्हारमध्ये अवकाळी पाऊस

Next

मुंबई/बदलापूर/जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई, उपनगर जिल्ह्यातील नागरिकांना रविवारी अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. मुंंबई, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच जव्हार तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या.
मुंबईत बोरीवली, मालाड येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास पडला. तर, अंबरनाथ आणि बदलापूरकरांनाही अवकाळी पावसाने दिलासा दिला. रविवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शनिवार, रविवार असे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता होती. अखेर रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण आल्हाददायक होऊन गारवा निर्माण झाला होता. विजाही चमकत होत्या. दरम्यान, अंबरनाथमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीदरम्यान पाऊस पडला. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह जराही कमी झाला नाही. कल्याणमध्येही संध्याकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
जव्हार तालुक्यात संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी वर्षभरात खळ्यावर जमा केलेले धान्य पावसात भिजले. त्यामुळे त्यांनी वर्षभरात केलेल्या मेहनतीचे नुकसान झाले.
>जव्हारमध्ये खळ्यावर जमवलेली भातशेती, नागली, उडीद, तूर, खुरसानी या शेतीची झोडणी आणि मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खळ्यावर पिके जमा केली होती. मात्र रविवारी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांनी खळ्यावर जमा केलेले धान्य भिजून नुकसान झाले.
>कल्याणमध्येही उकाडा प्रचंड जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक घामाघूम झाले असतानाच रविवारी संध्याकाळच्या सुमारास येथे पावसाने अचानक हजेरी लावली. अवेळी पडणाºया या पावसामुळे रविवारी सुटीच्या दिवशी संध्याकाळी फिरायला बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली.

Web Title: Rainfall in Ambernath, Badlapur, Kalyan, Jawhar with Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.