पावसामुळे झालेल्या अपघातांत १,२४९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:59 AM2019-12-25T05:59:26+5:302019-12-25T05:59:45+5:30
२०१८ ची आकडेवारी; धुक्यामुळे रस्ते अपघात होऊन २५४ जणांनी गमावला जीव
मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सोबतच पावसात ३,५४५ रस्ते अपघात होऊन यात १,२४९ जणांचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०१८ मध्ये राज्यात ३५,७१७ अपघात झाले. यात पावसामुळे ३,५४५, धुक्यामुळे ७५६, गारांमुळे १७३ तर, इतर कारणांमुळे ३१,२४३ अपघात झाले. या अपघातांत १३,२६१ जण मरण पावले.
पावसामुळे झालेल्या ३,५४५ अपघातांमध्ये १,२४९ जणांचा मृत्यू झाला, तर १,९६७ जण गंभीर जखमी झाले असून १,१२८ किरकोळ जखमी झाले. धुक्यामुळे झालेल्या ७५६ अपघातांमध्ये २५४ जणांचा मृत्यू झाला असून ४८४ जण गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमींची संख्या ३४६ एवढी आहे. गारांमुळे १७३ अपघात होऊन ५१ जणांनी जीव गमावला तर १०५ जण गंभीर जखमी झाले असून ५४ किरकोळ जखमी झाले. तसेच ३१,२४३ इतर अपघातांमध्ये ११,७०७ जणांचा मृत्यू झाला. १७,७७९ जण गंभीर जखमी, तर ९,५०२ जण किरकोळ जखमी झाले.
हवामान अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
पाऊस ३,५४५ १,२४९ १,९६७ १,१२८
धुके ७५६ २५४ ४८४ ३४६
गारा १७३ ५१ १०५ ५४
इतर ३१,२४३ ११,७०७ १७,७७९ ९,५०२
एकूण ३५,७१७ १३,२६१ २०,३३५ ११,०३०