मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सोबतच पावसात ३,५४५ रस्ते अपघात होऊन यात १,२४९ जणांचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०१८ मध्ये राज्यात ३५,७१७ अपघात झाले. यात पावसामुळे ३,५४५, धुक्यामुळे ७५६, गारांमुळे १७३ तर, इतर कारणांमुळे ३१,२४३ अपघात झाले. या अपघातांत १३,२६१ जण मरण पावले.
पावसामुळे झालेल्या ३,५४५ अपघातांमध्ये १,२४९ जणांचा मृत्यू झाला, तर १,९६७ जण गंभीर जखमी झाले असून १,१२८ किरकोळ जखमी झाले. धुक्यामुळे झालेल्या ७५६ अपघातांमध्ये २५४ जणांचा मृत्यू झाला असून ४८४ जण गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमींची संख्या ३४६ एवढी आहे. गारांमुळे १७३ अपघात होऊन ५१ जणांनी जीव गमावला तर १०५ जण गंभीर जखमी झाले असून ५४ किरकोळ जखमी झाले. तसेच ३१,२४३ इतर अपघातांमध्ये ११,७०७ जणांचा मृत्यू झाला. १७,७७९ जण गंभीर जखमी, तर ९,५०२ जण किरकोळ जखमी झाले.हवामान अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमीपाऊस ३,५४५ १,२४९ १,९६७ १,१२८धुके ७५६ २५४ ४८४ ३४६गारा १७३ ५१ १०५ ५४इतर ३१,२४३ ११,७०७ १७,७७९ ९,५०२एकूण ३५,७१७ १३,२६१ २०,३३५ ११,०३०