तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमीच;अवघा २६ टक्के जलसाठा जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:16 AM2020-07-19T03:16:34+5:302020-07-19T06:06:18+5:30
दोन वर्षांपूर्वी मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.
मुंबई : यावर्षी पावसाने तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्याने केवळ २६ टक्केच जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरी एक हजार मि.मी.हून अधिक पाऊस मुंबईत झाला आहे. मात्र तलाव क्षेत्रात पाऊस अधूनमधून तुरळक हजेरी लावत आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा असणे अपेक्षित असते. सध्या केवळ पावणेचार लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये जमा झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र त्या वर्षीही तलावांमध्ये आजच्या तुलनेत एवढा कमी जलसाठा नव्हता. २०१८ मध्ये तलाव क्षेत्रात जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यात दहा लाख ९२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होता. तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये सात लाख ३५ हजार पाणी जमा होते. तलावांमध्ये निम्मा जलसाठाही कमी झाला आहे़
जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा(दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ४८३९५ १५२.२६
तानसा १२८.६३ ११८.८७ ३३२९० १२१.७०
विहार ८०.१२ ७३.९२ १२६८९ ७७.९१
तुळशी १३९.१७ १३१.०७ १६४०९ १३८.९७
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ११३४० ५९५.८९
भातसा १४२.०७ १०४.९० १४३४५९ ११९.७६
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ५०४३४ २५५.०६