Join us  

मुंबईचा पाऊस २ हजार मिलीमीटर पार; जुलैपर्यंत २०४९ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:16 AM

मुंबई शहर आणि उपनगरात यंदा जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.

मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात यंदा जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाने जूनमधील तूट भरून काढली असून, ३० जुलैच्या अखेर दोन हजार ४९ मिमीचा टप्पा पार केला आहे.

मुंबई महानगर प्रदेशात पडत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठाही वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. 

दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने बाकी असून, या महिन्यांतही पाऊस आपली कसर पुरेपूर भरून काढेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

१) १,९०८ मिमी पावसाची नोंद कुलाबा येथील वेधशाळेत. 

२) २,०४९ मिमी पावसाची नोंद सांताक्रूझ येथील वेधशाळेत. 

जुलै २०२३ पर्यंत पडलेला पाऊस-

१) कुलाबा     १,७५७ मिमी

२) सांताक्रुझ     २,३१८ मिमी

‘वेगरिज ऑफ दी वेदर’ने नोंदविलेला पाऊस (मिमी) -

१)डहाणू -१५५१

१) बोईसर -१७९६

२) पालघर -२०६३ 

३) वसई -१८५७

४) सांताक्रुझ-२०५०

५) कुलाबा-१९०९

६) अलिबाग-२४३०

७) रोहा-२६२४

८) विरार-१५६७

९) ठाणे-२२५८

१०) बदलापूर-१९९०

११) पनवेल-२४३६

१२) पेण-२५४६

पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर नोंदला गेलेला पाऊस (मिमी)-

१) शहर -१,८३८

२) पूर्व उपनगर     -१,९६०

३) पश्चिम उपनगर -१,९२५ 

टॅग्स :मुंबईपाऊसहवामान