Join us

वसई-विरारमध्ये पावसाची संततधार

By admin | Published: July 17, 2014 1:31 AM

गेल्या ४ दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे उपप्रदेशातील पाणीटंचाई लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

वसई : गेल्या ४ दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे उपप्रदेशातील पाणीटंचाई लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गेले ४ महिने वसई-विरार उपप्रदेश पाणीटंचाईमध्ये होरपळून निघाला. शहरी भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण होत होती, तर दुसरीकडे टँकरवाल्यांनी मात्र परिस्थितीचा फायदा घेत गल्लाभरू व्यवसाय केला. वसई- विरार परिसरात दिवसभरात १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.वसई-विरार उपप्रदेशामध्ये गेला महिना पावसाअभावी कोरडा गेला. उपप्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवडयापर्यंत पावसाला सुरूवात होत असते. परंतु यंदा पावसाने महिनाभर दांडी मारली. गेल्या आठवडयात जोरदार पावसाला सुरूवात झाली. गेल्या ४ दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडला तर धरणातील पाण्याचा साठा वाढून पाणीटंचाई संपुष्टात येईल. गेल्या ४ दिवसांत वसई-विरारकर नागरिकांना सूर्यदर्शन होऊ शकलेले नाही. वातावरणात प्रचंड गारवा आला असून दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.