राज्यात अवकाळी पाऊस; वीज कोसळून सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:19 AM2019-04-17T06:19:45+5:302019-04-17T06:19:49+5:30

विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील काही भागाला मंगळवारी अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसला.

Rainfall in the State; Lightning struck six killed | राज्यात अवकाळी पाऊस; वीज कोसळून सहा ठार

राज्यात अवकाळी पाऊस; वीज कोसळून सहा ठार

googlenewsNext

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील काही भागाला मंगळवारी अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसला. वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. जोरदार वादळी वारा आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात दुपारी अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारांसह पाऊस पडला. वीज कोसळून अकोल्यातील पातूर तालुक्यातील पळसखेड येथील लता संजय चव्हाण (३६), बुलडाण्याच्या कोलवड येथे श्रीराम जाधव (५५) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. जळगाव जामोद येथील आर्यन बांगर (१२) व अजय गोंधळे (१५) हे गंभीर जखमी झाले आहेत. पाऊस आल्याने दोघांनी झाडाखाली आसरा घेतला होता. झाडावरच वीज कोसळल्याने दोघेही गंभीर भाजले. तर, बार्शीटाकळीतील दोनद येथे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. वर्धा जिल्ह्यातील अफजलपूर (ता. आष्टी) येथे शेतात वीज पडून पाच बकºया व एक बोकड ठार झाले.
मराठवाड्यात नांदेडसह उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नांदेडातील भोकर येथे वीज पडून दासा गणेश उपाटे (४२, रा़ बारड) याचा मृत्यू झाला. भोकरसह नायगाव, लोहा, नरसी, मुदखेड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला़ उस्मानाबादमध्ये उमरगा, लोहारा तालुक्यालाही पावसाचा तडाखा बसला. डाळिंबासह, पपई, केळी, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
>नाशिक जिल्ह्यात तिघांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात सलग तिसºया दिवशी पावसाने हजेरी लावली. बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघे ठार झाले. तर, दिंडोरी तालुक्यात संपत शंकर उदार (६५), देवळा तालुक्यातील वाजगाव येथे हौसाबाई फकिरा कुंवर (७१) आणि बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात योेगेश बापू शिंदे (३२) यांचा विजेने बळी घेतला. येथे कांदा व डाळींब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात सलग तिसºया दिवशी गारपीट झाली. यात हरभरा, कांदा व गहू पिकाचे नुकसान झाले आहे. तर शिंदखेडा तालुक्यात मालपूर येथे वीज कोसळून दोन बैल दगावले. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला.

Web Title: Rainfall in the State; Lightning struck six killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.