आंब्यासह भाजीपाल्याला पावसाचा फटका

By admin | Published: December 13, 2014 10:29 PM2014-12-13T22:29:20+5:302014-12-13T22:29:20+5:30

जिल्ह्यात मध्यरात्री अचानक अवेळी पाऊस पडल्यामुळे ठाणो शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ , भिवंडी आदी भागातील नागरीकांना विजेच्या लपंडावास तोंड द्यावे लागले.

Rainfall of vegetables with mangoes | आंब्यासह भाजीपाल्याला पावसाचा फटका

आंब्यासह भाजीपाल्याला पावसाचा फटका

Next
ठाणो : जिल्ह्यात  मध्यरात्री अचानक अवेळी पाऊस पडल्यामुळे ठाणो शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ , भिवंडी आदी भागातील नागरीकांना विजेच्या लपंडावास तोंड द्यावे लागले. तर मुरबाड, शहापूर, बदलापूर आदी ग्रामीण भागातील ऐन फुलो:यात आलेल्या आंब्यासह काही ठिकाणी काजू, चिकूच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पालेभाज्यांसह रब्बी तूर, हरबरा आदी पिकांचे देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
मध्यरात्री पडलेल्या पावसाप्रमाणोच सुमारे एक महिन्यांपूर्वी देखील जिल्ह्यात सलग तीन दिवस अवेळी पाऊस पडलेला आहे. त्यावेळीदेखील शेतक:यांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी मात्र भात कापून त्यांच्या खळ्यांमध्ये गंज्या घालण्यात आलेल्या आहेत. यामुळे भाताचे जास्त नुकसान झाले नाही. परंतु, आंबा, काजू, ही फळे व भेंडी, गवार आदी भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी अधिक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केला आहे.    
जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड परिसरात पाऊस पडत असल्यामुळे उभ्या भाताचे नुकसान होत आहे. जनावरांचा चारा खराब  होत आहे.   मोहर गळून पडत असल्यामुळे आंबा, काजूचे नुकसान  होत आहे. तर पालेभाज्याचे नुकसान सुरू आहे. फुलशेतीसह चिकूचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर वीटभटट्य़ांचे देखील नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  (प्रतिनिधी)
 
4शुक्र वारी रात्नी विजेच्या गडगटासह ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. हा अवकाळी पाऊस जवळपास एक तास कोसळत होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात वीज गायब झाली होती. 
4ठाणो आणि आजूबाजूच्या परिसरात शुक्र वारी मध्यरात्नीनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आल्मेडा रोडसह अनेक सखल भागात पाणी साचले होते.   
4शहराच्या अनेक भागातील वीज गायब झाली होती. काही भागात गायब झालेली ही वीज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा आली . तर काही भागात शनिवारी सकाळर्पयत ती आलेली नव्हती. 
 
वीट उत्पादक संकटात
लोनाड : विटांसाठी येणारा खर्च हा विक्री भावापेक्षा अधिक असल्याने भिवंडी तालुक्यातील विट उत्पादक धंदेवाईक हैराण झाले आहेत. त्यात विट तयार करण्यासाठी असलेले मनुष्यबळ म्हणजे बेभरवशी असून  विम्यासाठी शासनाच्या जाचक अटी असे असताना एक ना अनेक समस्यांना सामोरे जाणा:या विट उत्पादकाचे शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान  झाल़े 
 
कल्याणला झोडपले
शुक्रवारी दिवसा व रात्री विजेचा लपंडाव सुरू असतानाच मध्यरात्रीनंतर पावसाने कल्याण शहराला चांगलेच झोडपून काढले. रात्री सुमारे तीन तास दोन वेळा वीज खंडीत झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळनंतर तापमान कमी झाले. आभाळातही ढग आले होते. सुमारे तीनच्या सुमारास पावसाने आपली हजेरी लावली. सहार्पयत चांगला पाऊस झाला. कल्याण पश्चिमेकडे टिळक चौक, आग्रा रोड, दक्षिणमुखी मारूती मंदिरासमोर पावसाचे पाणी साचल्याने सकाळी पायी शाळेत जाणा:या तसेच  टिळक चौकाकडे जाणा:या पादचा:यांचे चांगलेच हाल झाले. या पावसाचा म्हशींसाठी गोठय़ात साठवून ठेवलेल्या गवताचे मोठे  नुकसन झाले. सकाळी रस्ते ओले झाल्याने रस्त्याने जाणा:या वाहनांचा वेग मंदावला होता. पण त्याचा वाहतुकीवर किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नाही.
 
भिवंडीत शेतक:यांचे नुकसान
अनगांव: भिवंडी तालुक्यात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस व गारपिटीने तालुक्याला झोडपून काढले. यामुळे मिरची, भेंडी, गवार आदी भाजीपाल्यासह आंबा पिकाचं मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार  पाऊस पडल्याने व शेतात पाणी साचल्याने शेतक:यांनी पेरलेले हरभरा, मुग, तूर, तीळ, वाल, सोयाबीन या पिकांचेही  संपूर्ण नुकसान झाल्याने ते हवालदील झाले आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी  शेतक:यांनी केली आहे.

 

Web Title: Rainfall of vegetables with mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.