Join us

मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत जोर'धार' पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 2:51 PM

मुंबईमध्ये येत्या 24 ते 48 तासांत पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावसानं हजेरी लावली. दुपारी पावसानं विश्रांती घेतली असली तरी येत्या 24 ते 48 तासांत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.

मुंबई, दि. 15 - मुंबईमध्ये येत्या 24 ते 48 तासांत पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावसानं हजेरी लावली. दुपारी पावसानं विश्रांती घेतली असली तरी येत्या 24 ते 48 तासांत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.  मुंबई नगरसह उपनगरांत गुरुवारी संध्याकाळीदेखील जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला.  मुंबईमध्ये शुक्रवारी (15 सप्टेंबर ) सकाळीदेखील पावसाची संततधार कायम होती. यामुळे पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिरानं सुरू होती. कार्यालय गाठण्याच्या घाईत असताना ऐन वेळी झालेल्या रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवासी हैराण झाले होते. दरम्यान, कुलाबा हवामान विभागानं गुरुवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत 32 मिमी पावसाची नोंद केली आहे. तर सांताक्रूझ हवामान विभागात गुरुवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत 51.2 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  

गुरुवारी संध्याकाळी कुठे, किती पाऊस पडला?दादर 44 मिमीवांद्रे 43 मिमीसांताक्रुझ 41 मिमीअंधेरी 38 मिमीकुर्ला 32 मिमीशीव 23 मिमीवरळी 23 मिमीभायखळा 25 मिमीपरळ 22 मिमीचेंबूर 26 मिमीदिंडोशी 17 मिमीकांदिवली 15 मिमी

मुसळधार पावसामुळे साता-यातील 60 फूट लांब सोमंथळी पूल गेला वाहूनसातारा जिल्ह्यात कोकणातील महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता थोडक्यात टळली आहे. गुरुवारपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे फलटण-बारामती मार्गावरील 60 फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूल कोसळल्याची घटना स्थानिक लोकांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर पुलावरुन जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करणारे दोन बाईकस्वार वाहून गेल्याची माहिती समोर आहे.  दरम्यान, साता-यासह दक्षिण महाराष्ट्रात शुक्रवारदेखील (15 सप्टेंबर) जोरदार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.