Join us

महाराष्ट्र २०० ठिकाणी पाऊस मोजणार, पर्जन्यमापके वितरित केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 7:49 AM

सेंटर फॉर सिटीजन सायन्सच्या सतर्क रेनगेट नेटवर्क या उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण दोनशे पर्जन्यमापके वितरित केले जाणार आहेत

मुंबई :  राज्याच्या कोनाकोपऱ्यात काही ठिकाणी पूर येईस्तोवर पाऊस कोसळतो, तर कुठे पाऊस पडत नाही. अशा पावसाच्या नोंदी प्रत्येकवेळी सरकारी दरबारी होतीलच, असे नाही. परिणामी राज्यभरातील नागरिकांना आपल्या परिसरात पाऊस मोजता यावा, त्याची नोंद ठेवता यावी तसेच भविष्यात अनेक उपाययोजना करता याव्यात, यासाठी सतर्कतर्फे नागरिकांच्या सहभागातून महाराष्ट्रात २०० ठिकाणांहून पाऊस मोजण्याचा उपक्रम यंदा राबविण्यात येणार आहे.

सेंटर फॉर सिटीजन सायन्सच्या सतर्क रेनगेट नेटवर्क या उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण दोनशे पर्जन्यमापके वितरित केले जाणार आहेत. राज्यभरातील पर्जन्यमापकांच्या या नेटवर्कचा उपयोग दरडी, भुस्खलन, अतिवृष्टी, वादळी पाऊस, पूर, दुष्काळ, आदी स्थितींच्या नेमक्या आकलनासाठी अभ्यासकांना होईल. येत्या मान्सूनपर्यंत सतर्कचे पर्जन्यमापकांचे नेटवर्क मोबाइल ॲपद्वारे जोडण्यात येणार आहे. ॲपमुळे नागरिकांनी केलेल्या पावसाच्या नोंदी सर्वांसाठी नकाशावर उपलब्ध असतील.  

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्र