Join us

यंदा १३७ टक्के पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 6:00 AM

मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात पाऊस तुरळक हजेरी लावत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

मुंबई : मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात पाऊस तुरळक हजेरी लावत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र यंदा पावसाची बँटिंग सुरूच असून यावर्षी ३४६२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सांताक्रूझ वेधशाळेनुसार सरासरी १३७ टक्के पाऊस झाला.पालिकेच्या आकडेवारीनुसार यापूर्वी २६ जुलै २००५ रोजी मुंबईत २४ तासांत ९४४ मि.मी. पाऊस कोसळला होता. वीकेण्डला जोरदार हजेरी लावून पाऊस मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत ९०४ मि.मी पाऊस झाला आहे. १९५४मध्ये याच महिन्यात ९२ मि.मी. पाऊस झाला होता. वार्षिक सरासरी २१४६.६ मि.मी पावसाची नोंद होते. १९५४ मध्ये ३४५१.६ मि.मी. पाऊस झाला होता. सोमवारी पावसाचा जोर ओसरला तरी अधूनमधून हलक्या सरी बरसत राहिल्या. रविवार ते सोमवार या २४ तासांमध्ये कुलाबा येथे १२. २ मि.मी. तर सांताक्रूझ येथे ९. ४ मि.मी पाऊस झाला आहे. पुढील २४ तास मुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.