राज्यात पावसाची पुन्हा बॅटिंग; पुढील चार-पाच दिवसांत पाऊस चांगला सक्रिय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:04 AM2023-09-04T07:04:38+5:302023-09-04T07:04:45+5:30

२९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी 

Rains batting again in the state; The rains will be very active in the next four-five days | राज्यात पावसाची पुन्हा बॅटिंग; पुढील चार-पाच दिवसांत पाऊस चांगला सक्रिय होणार

राज्यात पावसाची पुन्हा बॅटिंग; पुढील चार-पाच दिवसांत पाऊस चांगला सक्रिय होणार

googlenewsNext

मुंबई/पुणे : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा रविवारी पावसामुळे सुखावला. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. ७ सप्टेंबरपर्यंत कोकण, गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

२९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी 
यंदा मान्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज सपशेल फोल ठरला. पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कमी पाऊस झाला. २९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही मोजके जिल्हे सोडल्यास पुरेसा पाऊस झाला नाही.

Web Title: Rains batting again in the state; The rains will be very active in the next four-five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.