पावसाने २४ तासांत वाढविला आठ दिवसांचा जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:13 AM2020-08-06T01:13:16+5:302020-08-06T01:13:26+5:30

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.

Rains increase water storage by eight days in 24 hours | पावसाने २४ तासांत वाढविला आठ दिवसांचा जलसाठा

पावसाने २४ तासांत वाढविला आठ दिवसांचा जलसाठा

Next

मुंबई : सलग दोन दिवस मुंबईला झोडपणाऱ्या पावसाने अखेर तलाव क्षेत्रातही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे २४ तासांच्या कालावधीत आठ दिवसांचा जलसाठा वाढला आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाºया प्रमुख तलावांमध्ये एकूण ३८ टक्के जलसाठा जमा झाला आहे. दरम्यान बुधवारपासून मुंबईकरांना २० टक्के पाणीकपाती लागू करण्यात आली आहे.

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र जुलै अखेरीस तलाव क्षेत्रात ३४ टक्के जलसाठा असल्याने ५ आॅगस्ट म्हणजेच बुधवारपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र गेले दोन दिवस मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी तलाव क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे २४ तासांच्या कालावधीत ३३ हजार ४११ दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. सध्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा तलावांमध्ये आहे.

रुग्णांचे हाल, रुग्णालयात पाणी
पावसाचा फटका शहर उपनगरातील काही रुग्णालयांनाही पोहोचला. जे.जे रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी शिरले. याखेरीज, पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयाचा परिसरही जलमय झाला होता. केईएम रुग्णालयात वाºयामुळे रस्त्यावर व काही गाड्यांवर फांद्या पडल्याचे दिसून आले. सध्या साथीचे आजारही डोके वर काढत असल्याने पालिकेची रुग्णालय नॉनकोविड करण्यात येत आहेत. त्यामुळे तेथे रुग्णांची गर्दी होती, पण रुग्णांनाही पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

५ आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठा (दशलक्ष लीटर)
वर्ष जलसाठा टक्के
२०२० ५३९३०७ ३७.२६
२०१९ १३०१९८४ ८९.९६
२०१८ १२१८६९२ ८४.२०

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा सध्या
(दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ५३३३७ १५३.०४
तानसा १२८.६३ ११८.८७ ४११०६ १२२.२९
विहार ८०.१२ ७३.९२ २५२२८ ७९.६५
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.५५
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ४६०८६ ५९७.४२
भातसा १४२.०७ १०४.९० २९२७०३ १२३.८१
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ७२८०३ २६१.५०
 

Web Title: Rains increase water storage by eight days in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.