मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाची रविवारी मुंबईत रिमझिम पाहायला मिळाली. सकाळी तसेच दुपारी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली हाेती. दुपारी १२ वाजता तुरळक ठिकाणी पडलेले ऊन वगळता दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, पुढील २४ तास मुंबईत असेच वातावरण राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, २८ जून रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल.
...............................